आपल्या भारत देशात ज्या काही योजना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारराबवतात त्या प्रत्येक योजनेतून मिळणार लाभ हा वेग वेगळा असतो. अश्या काही योजना आहेत त्यात कधी आर्थिक मदत दिल्या जाते तर कधी शेतकऱ्यांना काही शेतीसाठीसाठी उपयोगी असणारे वस्तूंचं वाटप केल्या जाते आणि कधी काही प्रमाणात सबसीडी दिल्या जाते.
भारत का कृषिप्रधान देश आहे यामध्ये ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. बहुतांश शेती ही निसर्गाच्या आणि वातावरण्याच्या बदलावर अवलंबून असते. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमचे वडील शेतकरी असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे शेतकरी हा अतोनात हाल अपेष्टा सहन करून मोठया कष्टाने आणि अंगमेहनतीने स्वतःला शेतीत झोकून देतो, प्रसंगी कर्जबाजारी होतो त्यांची कायम आशा ही एकाच असते कि त्याने आणि त्याच्या परिवाराने शेती कसायला घेतलेल्या मेहनतीचं चीझ व्हावं, नवा पैसे घरी यावा, आर्थिक तंगी दूर व्हावी, असे एक ना अनेक स्वप्न उराशी कवटाळून तो जिद्दीने जगण्याशी संघर्ष करतो पण कधी कधी आलेल्या नेसर्गिक आपत्तीमुळे म्हणा किंवा पिकांवर आलेल्या इतर प्रादुर्भामुळे म्हणा आपल्या शेतकऱ्याचे प्रचंड प्रेमात नुकसान होते आणि शेतकरी हवालदिल होतो आणि कधी तर आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो ही वस्तुस्थिती आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र सरकारने सुरु केलेली अशी योजना आहे जी अश्या प्रसंगी शेतकऱ्यांना बळ देते आणि त्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देते.
केंद्र सरकारद्वारे सुरु केलेल्या या योजनेत शेतकऱ्यांचा पीक विमा काढला जातो ज्याचा काही हप्ता शेतकऱ्याला द्यावा लागतो आणि उरलेला हप्ता सरकार मार्फत भरला जातो. या योजनेत तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या कुठल्याही पिकाचा विमा काढता येतो आणि जर ते पीक काही कारणास्तव खराब झाले तर सादर विमा कंपनी आवश्यक ती पडताळणी करून तुम्हाला तुमची झालेली नुकसान भरपाई देते.
जर तुम्हाला या योजेबद्दल माहिती नसेल आणि तुम्हाला या योजेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख नक्कीच वाचा ज्यात आम्ही तुम्हाला या योजने संधर्भात परिपूर्ण माहिती दिली आहे जसे कि ही योजना काय आहे, या योजनेचे मख्य उद्धीष्ट्य काय आहे, अर्ज कसा आणि कोठे करायचा, आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती इत्यादी. जी वाचून तुम्ही तुमचा अर्ज सहज भरू शकाल आणि या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
प्रधानमंत्री पीक योजना ही योजना भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी १३ जानेवारी २०१६ साली सुरु केली.
ही योजना भारत सरकारची एक फ्लॅगशिप योजना आहे जी देश अंतर्गत चालवली जात आहे. PM Fasal Yojna भारतीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे राबविली जाते.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी कर्ज काढले आहे किंवा त्यांच्या पिकांचे अचानक झालेल्या पावसामुळे अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झालं आहे असे सर्व शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ही योजना शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी करून शेती व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी अंमलात आणल्या गेली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा निधी दिला जातो. ही योजना महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या इतरही राज्यांमध्ये राबविली जाते.
योजनेचे ठळक मुद्दे कोणते आहेत ?
शेतकऱ्यांना त्यांच्या खरीप पिकांसाठी फक्त २ टक्के आणि रब्बी पिकांसाठी १.५ टक्के रक्कम भरावी लागेल. वर्षभर घेतल्या जाणाऱ्या व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी ५ टक्के इतकी रक्कम भरावी लागेल .
शेतकऱ्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या विमा हफ्त्याचे दर हे खूपच कमी राहतील आणि उर्वरित हफ्ते हे सरकार भरणार आहे. ज्यामुळे नैसर्गिक किंवा इतर कुठल्याही आपत्तीने पिकाचे झालेले नुकसानीसाठी शेतकऱ्यांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळण्यास मदत होईल
सरकार कडून मिळणाऱ्या अनुदानावर कुठलीही कमाल किंवा किमान मर्यादा नाही. तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे पिकविम्याचे उरलेले हफ्ते तुम्ही भरू शकत नसाल तर आपले सरकार त्यासाठी जास्तीत जास्त किंबहुना ९० टक्के रकम स्वतः भरून तुम्हाला पिकविम्याची संपूर्ण रक्कम मिळवून देणार
याआधी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकविम्याच्या रकमेवर काही मर्यादा होत्या ज्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी दावा केलेल्या रकमेपेक्षा त्यांना कमी रक्कम मिळत होती पण आता सरकारने कि मर्यादा काढून टाकली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकविम्याची संपूर्ण रक्कम मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४ Overview
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४ |
विभाग | भारतीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विभाग |
कुणी सुरु केली | केंद्र सरकार |
पात्र लाभार्थी | भारत देशातील सर्व शेतकरी |
मुख्य उद्धिष्ट | शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करणे |
मिळणारा निधी | २ लाख |
हेल्पलाईन नंबर | १८००-१८०-११११ / १८००-११०-००१ |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन किंवा ऑफलाईन |
सरकारी अधिकृत वेबसाइट | https://www.pmfby.gov.in/ |
प्रधानमंत्री पीक योजना चे फायदे काय आहे?
प्रधानमंत्री पीक योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भरपूर फायदे मिळणार आहेत त्यातील काही फायदे खाली दिले आहेत.
१. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी संपूर्ण विमा रक्कम मिळणार
२. ऑनलाईन विमा कॅल्कुलेटर
३. शेतीव्यवसायाला बळकटी आणणे
४. खूप कमी किमतीत विमा निघणार
५. ऑनलाईन अर्ज सोप्या पद्धतीने करता येणार
६. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळणार
६. शेतकऱ्यांसाठी २४ तास हेल्पलाईन सुविधा उपलब्ध
या योजनेअंतर्गत कुठल्या कुठल्या पिकांचा विमा काढता येतो?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल आणि जर तुम्ही पीक विमा काढण्यासाठी योग्य ती रक्कम भरण्यास तयार असाल तर तुम्हाला तुमचे पिकाचे नाव हे खालील दिलेल्या यादीत आहे कि नाही हे आधी तपासावे लागेल जर तुमच्या पिकाचे नाव त्यात नसेल तर तुंम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि असेल तर तुम्ही यासाठी योजनेसाठी अर्ज करू शकता.
१. तांदूळ किंवा धान, गहू , बाजरी इत्यादी
२. कापूस, ऊस, ताग
३. हरबरा, वाटाणा, तूर,मसूर, मूंग,सोयाबीन, उडीद, चवळी इत्यादी
४. तीळ, मोहरी, भुईमूंग, करडई, एरंडेल, सूर्यफूल, सरकी, दोडका, फुलाची शेती , जवस, कराळ इत्यादी
५. केळ, कांदे, अद्रक, बटाटा, द्राक्षे, टमाटर, विलायची,हळद,फुलकोबी, सफरचंद, संत्रे, अननस, चिकू, पपई, आंबा, पेरू इत्यादी
PM Fasal Yojana साठी आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील पात्रता पूर्ण करावी लागेल
१. देशातील सगळेच शेतकरी ज्यांची स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे किंवा ते शेती भाडे तत्वावर घेऊन त्यात योजनेत समाविष्ठ केलेल्या पिकांचे उत्पादन घेत असावा
२. प्रधानमंत्री पीक योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणारी व्यक्ती हि भारताची नागरिक असावी
३. शेतकरी हा आर्थिकदृष्टया गरीब किंवा मध्यम कुटंबातील असावा
४. शेतकऱ्याजवळ या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे असावी.
५. किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांचा पीक विमा हा त्या बॅंकेतद्वाराच केला जातो
प्रधानमंत्री पीक योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. बँकेचे पासबुक
३. पिकाचे क्षेत्रफळ
४. ७/१२ उतारा
५. ८ अ उतारा
६. पीकपेरा घोषणापत्र
७. पीकविमा माहिती पत्र
प्रधानमंत्री पीक योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल आणि आत्तापर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही खालील दिलेल्या Steps follow करून या योजनेसाठी अर्ज करू शकता,
१. सुरवातीला तुम्ही pmfby.gov.in असे सर्च तुम्हाला प्रधानमंत्री पीक योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन होईल
२. आता तुम्हाला होम पेज वर दिसणाऱ्या Farmer corner वर क्लिक करायचे आहे
३. Guest Farmer ऑपशन वर क्लिक करा
४. आता तुमच्या समोर पीक योनजेचा फॉर्म दिसेल
५. अर्जात विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरा
६. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला Create User Option वर क्लिक करायचं आहे
७. तुमचा मोबाइल नंबर टाकून व्हेरिफाय करा आणि पुन्हा तुमच्या मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा
८. आता अर्जात आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा
९. शेवटी Submit बटण वर क्लिक करा
अश्या सोप्या पद्धतीने तुमचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे
प्रधानमंत्री पीक विम्यासाठी दावा कसा करायचा?
प्रधानमंत्री पीक योजनेच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यावर लगेच किंवा ७२ तासाच्या आतमध्ये सदर विमा कंपनीला याची सूचना द्यावी लागेल. विमाकंपनी तुमची तक्रार नोंदवून घेईल आणि त्या कंपनीचे अधिकारी तुमच्या शेताच्या निरीक्षणासाठी येतील आणि सर्व पडताळणी झाल्यानंतर विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही १८००-१८०-११११ / १८००-११०-००१ या टोल फ्री सपोर्ट नंबरवर कॉल करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता
शेतकरी बांधवांनो जर तुम्ही तुमच्या पिकाचा पीक विमा काढला असेल आणि पीक विम्याच्या रकमेसाठी तुम्हाला दावा करायचा असेल तर खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण आहे.
प्रधानमंत्री पीक योजनेच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यावर लगेच किंवा ७२ तासाच्या आतमध्ये सदर विमा कंपनीला याची सूचना द्यावी लागेल. तुम्ही पीक कापणी झाल्यानंतर १४ दिवसापर्यंतच विम्याच्या रकमेसाठी दावा करू शकता त्यानंतर जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले तर विम्याची रकम मिळणे कठीण होईल. पीक नुकसानीची सूचना तुम्ही तुमच्या मोबाईल App द्वारा पण नोंदवू शकता त्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.
१. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइलला च्या Google Play स्टोर मध्ये जाऊन “Crop Insurance App” डाउनलोड करावे लागेल.
२. आता या मोबाईल App ला ओपन करा
३. तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल
४. इथे तुम्ही खाली “Change Language” या ऑपशन वर क्लिक करून मराठी भाषा निवडू शकता
५. यानंतर Continue without Login ऑपशन वर क्लिक करा
६. तुमच्यासमोर ५ ऑपशन येतील त्यातील “Crop Loss” यावरती क्लिक करा
७. आता तुम्हाला २ ऑपशन दिसतील
१. Crop Loss Intimation
२. Crop Loss Status – यामध्ये तुम्ही आधी केलेल्या दाव्यासंबंधी माहिती मिळेल
८. Crop Loss Intimation यावरती क्लिक करा
९. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलवर आलेला नंबर टाका
१०. त्यानंतर तुम्हाला Season या ऑपशन वर क्लिक करून खरीप किंवा रब्बी पीक निवडायचं आहे. (खरीप पिकाचा कालावधी हा जुलै ते ऑक्टोबर असतो आणि रब्बी पिकाचा कालावधी हा नोव्हेंबर ते मार्च असतो )
११. आता तुम्ही Year (वर्ष) मध्ये २०२४ टाकून Scheme (योजना) मध्ये “प्रधानमंत्री पीक विमा योजना” निवडा
१२. तुम्हाला तुमचे State (राज्य ) निवडून Select ऑपशन वर क्लिक करायचे आहे
१३. तुमच्या समोर दिसणारी नवीन पेजवर “Form Where Did You Enroll” मध्ये तुमची बँक सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर “Do You Have Application/Policy Number?” याला ऑन करायचं आहे
१४. शेवटी तुम्हाला Application/Policy Number टाकायचा आहे आणि Done वरती क्लिक करायचं आहे
१५. तुमच्या समोर तुमची Policy open होईल ज्यात तुम्चाला तुमच्या नुकसानग्रस्त पिकांचे फोटोज आणि विडिओ अपलोड करायचे आहेत आणि विम्याच्या रकमेवर दावा करायचा आहे.