केंद्र सरकार द्वारा सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यातील उच्च शिक्षण तथा लग्नासाठी होणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी सुरु केली गेली आहे ज्यामुळे मुलीचे आई वडील हे तिच्या भविष्याची चिंता सोडून तीच उत्तम प्रकारे पालन पोषण करू शकतील. जस कि तुम्हाला माहीतच आहे कि आपली केंद्र सरकारच ब्रीदवाक्य हे “बेटी बचाओ बेटी पढाओ” आहे. याच अनुशंघाने आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी २०१५ साली सुकन्या समृद्धी योजना अंमलात आणली.
केंद्र सरकार द्वारा सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यातील उच्च शिक्षण तथा लग्नासाठी होणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी सुरु केली गेली आहे ज्यामुळे मुलीचे आई वडील हे तिच्या भविष्याची चिंता सोडून तीच उत्तम प्रकारे पालन पोषण करू शकतील. जस कि तुम्हाला माहीतच आहे कि आपली केंद्र सरकारच ब्रीदवाक्य हे “बेटी बचाओ बेटी पढाओ” आहे. याच अनुशंघाने आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी २०१५ साली सुकन्या समृद्धी योजना अंमलात आणली.
जर तुमच्या घरात एका लहान मुलीने जन्म घेतला असेल तर तुम्हाला जर तिच्या भविष्याची चिंता होत असेल तर आता तुम्हाला ही चिंता करण्याची बिलकुल गरज नाहीयेय कारण केंद्र सरकार तर्फे सुकन्या समृद्धी योजनेतून तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणाचा आणि तिच्या लग्नाचा सर्व खर्च निश्चिंतपणे दूर करू शकता
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारच्या बेटी बचाओ , बेटी पढाओ या योजनेचाच एक भाग आहे ज्यामध्ये १० वारश्याखालील मुलींचे पालक या योजने अंतर्गत आपल्या मुलींचे अकाउंट्स कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये ओपन करू शकतात. हे अकाउंट २१ वर्ष्यापर्यंत किंवा मुलीच्या वयाच्या १८ वर्ष्यानंतर तिच्या लग्नापर्यंत वैद्य राहील.
या योजने मुळे तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य तर उज्वल करूच शकता त्याच सोबत तुमच्या मुलीचं लग्न, तीच उच्च शिक्षण आणि इतरही बराचसा फायदा घेऊ शकता.
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना २०२४ मध्ये खाते उघडायचा आणि या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या योजने संबंधी सर्व माहिती देणार आहोत जसे कि सुकन्या समृद्धी योजना नेमकी काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत, या योजनेचे फायदे काय आहेत इत्यादी माहिती तुम्हाला या लेखात मिळून जाईल.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ची ठळक वैशिट्ये
व्याज दर | ८.२% प्रति वर्ष |
कधीपासून रक्कम जमा करता येणार | खात उघडण्याच्या तारखेपासून १५ वर्ष्यापर्यंत |
परिपक्वता (माँटुरिटी) कालावधी | २१ वर्ष किंवा मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत |
कमीकमी जमा करावयाची रक्कम | २५० रुपये |
जास्तीत जास्त जमा करावयाची रक्कम | एका आर्थिक वर्ष्यात १.५ लाख |
योग्यता | १० वर्ष्याहून कमी वय असणाऱ्या मुलीचे आई वडील किंवा कायद्याने पालक मुलीच्या नावाने खातं उघडू शकतात |
Official Website | https://www.india.gov.in/sukanya-samriddhi-yojna |
सुकन्या समृद्धी येजनेसाठी पात्रता:
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे आई वडील किंवा पालक तिच्याच नावाने खात उघडू शकतात
- खाते उघडताना मुलीचे वय हे १० वर्ष्यापेक्षा कमी असावे
- मुलीच्या जन्माच्या वेळी सुद्धा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट उघडू शकता
- जर तुम्हाला २ मुली असतील तरी सुद्धा तुम्ही दोघींचही अकाउंट उघडू शकता पण जर का तुम्हाला ३ मुली असतील तर तुम्ही फक्त दोघींचं च अकाउंट उघडू शकता
- तुम्हाला जर आधी एक मुलगी असेल आणि नंतर जुळ्या मुली झाल्या त्यामध्ये तुम्ही तिघींचं पण अकाउंट उघडू शकता
- एका मुली साठी एकापेक्षा जास्त सुकन्या समृद्धी खाते उघडता येत नाहीत
- एका कुटुंबासाठी फक्त २ सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची परवानगी आहे
- हि योजना समाजातील सर्व घटकांसाठी आहे ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी २५० रुपये व जास्तीत जास्त १.५ लाख पर्याय पैसे डेपोसिट करू शकता तेही तुमच्या सोयीनुसार
- पोस्ट ऑफिस किंवा इतर कुठल्याही बँकेत तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता
- तुम्हाला हा पैसे १५ वर्ष्यापर्यंत जमा करत राहावे लागणार
- अकाउंट ओपन केल्यांनतर २१ वर्ष्यानंतरच तुम्ही पूर्ण पैसे काढू शकता परंतु जर तुम्हाला यातील काही रक्कम मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी हवी असेल तर तुम्हाला संपूर्ण रक्कमेपेक्षा ५०% रक्कम काढता येते येते
या सर्व कारणांमुळे हि योजना खूप जास्त पसंतीस उतरली आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या योजनेत नोंदणी करीत आहेत.
टीप: सुकन्या समृद्धी खाते हे खालील काही परिस्थितीत दोन पेक्ष्या जास्त मुलींसाठी उघडता येऊ शकते
- जर जुळ्या किंवा तीन मुलींच्या जन्माच्या आधी एका मुलीचा जन्म झाला किंवा एकाच वेळी तिन्ही मुलींचा जन्म झाला असेल तर तिसरे खाते उघडता येते
- जर जुळ्या किंवा तीन मुलींच्या जन्माच्या नंतर एका मुलीचा जन्म झाला तर तिसरे खाते उघडता येत नाही
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये रक्कम जमा करण्याचे फायदे
बेटी बचाओ , बेटी पढाओ या योजनेचाच एक भाग असलेली समृद्धी योजनेचे खूप सारे फायदे आहेत त्यातील काही फायदे खालील प्रमाणे आहेत
अधिक व्याज दार: PPF सारख्या कुठल्याही सरकारी योजनेच्या तुलनेत समृद्धी योजना ही जास्त व्याज देणारी आहे. या योजने मध्ये सध्या ८.२ % इतका व्याज दर देण्यात येत आहे
परताव्याची १००% हमी: सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळणार
तुमच्या सवलती नुसार रक्कम भरा: कुणीही व्यक्ती एका वर्ष्यात कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ ला रक्कम तुमच्या सवलती नुसार जमा करू शकतात.
अकाउंट ट्रान्सफर : सुकन्या समृद्धी अकाउंट तुम्ही देशातल्या कुठल्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये सहज ट्रान्सफर करू शकता
टॅक्सचा लाभ:
- सुकन्या समृद्धी योजनेवर तुम्हाला ८०क अंतर्गत १.५ लाखापर्यंत सूट मिळते
- तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैस्या वरती मिळणारा नफा सुद्धा टॅक्स फ्री असणार आहे
- माँटुरिटी पिरियड नंतर मिळणार नफा सुद्धा टॅक्स फ्री आहे
- कुठलीही बँक तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती जास्तीत जास्त ३-४% पर्यंतच परतावा देते परंतु या योजतेन तुम्हांला कमीत कमी ६ टक्क्यापर्यंत परतावा मिळतो आणि या वर्षी म्हणजेच २०२४ ला तो ८.२ टक्के मिळतोय
हा इंटरेस्ट रेट दरवर्षी बदलत असतो, जेव्हा हि योजना सुरु झाली होती तेव्हा इंटरेस्ट रेट ला ९. १ टक्के मिळाला होता
SSY अकाउंट ठरलेल्या कालावधीच्या आधीच बंद होणे
१८ वर्ष झाल्यानंतर मुलगी स्वतः तिच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी अकाउंट ठरलेल्या कालावधीच्या आधीच बंद करू शकते. याव्यतिरिक्त खालील परिस्थितीमध्ये सुद्धा जमा झालेली रक्कम कडून अकाउंट बंद करता येते
अकाउंट धारकाचा आकस्मित मृत्यु :
जर या योजनेत सहभागी झालेल्या मुलीचा मृत्यु झाला ते तिचे आई वडील किंवा पालक हे अकाउंट मधील जमा झालेली रोख रक्कम आणि त्यावरील व्याजाची रक्कम काढू शकतात. त्यासाठी त्यांना संबंधित दस्तवेज सादर करावे लागतील आणि एकदा का त्या दस्तवेजची पडताळणी झाली तर लगेच हाही रक्कम नॉमिनीच्या अकाउंट वॉर हि तात्काळ जमा केली जाते.
अकाउंट चालू ठेवण्यात असमर्थता: केंद्र सरकारने सुचवल्या प्रमाणे जर का गुंतवणूकदार अकाउंट मध्ये गुंतवणूक करण्यास असमर्थ असेल तर त्याला हे अकाउंट बंद करण्याची मुभा आहे. त्याचबरोबर जर गुंतवणूक करतांना जर गुंतवणूक दाराला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल असेल तर संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्याला सांगून हे अकाउंट बंद करू शकतो
सुकन्या योजनेचे व्याज दर
सुकन्या समृद्धी योजनेसाठी Q४ जानेवारी ते मार्च (वित्तीय वर्ष २०२३ -२०२४) साठी ८.२ प्रति वर्ष इतका व्याज दर निर्धारित केली गेला आहे
सुकन्या समृद्धी योजनेचे आत्तापर्यंतचा इंटरेस्ट रेट तुम्ही खाली बघू शकता
कालावधी | वार्षिक व्याज दर (%) |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ (Q3 FY 2023-24) | ८ |
जुलै ते सप्टेंबर २०२३ (Q1 FY 2023-24) | ८ |
एप्रिल ते जून २०२३ (Q1 FY 2023-24) | ८ |
जानेवारी ते मार्च २०२३ (Q4 FY 2022-23) | ७.६ |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ (Q3 FY 2022-23) | ७.६ |
एप्रिल ते सप्टेंबर २०२२ (Q2 FY 2022-23) | ७.६ |
एप्रिल ते जून २०२२ (Q1 FY 2022-23) | ७.६ |
जानेवारी ते मार्च २०२२ (Q4 FY 2021-22) | ७.६ |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ (Q3 FY 2021-22) | ७.६ |
जुलै ते सप्टेंबर २०२१ (Q2 FY 2021-22) | ७.६ |
एप्रिल ते जून २०२१ (Q1 FY 2021-22) | ७.६ |
जानेवारी ते मार्च २०२१ (Q4 FY 2020-21) | ७.६ |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० (Q3 FY 2020-21) | ७.६ |
जुलै ते सप्टेंबर २०२० (Q2 FY 2020-21) | ७.६ |
एप्रिल ते जून २०२० (Q1 FY 2020-21) | ७.६ |
जानेवारी ते मार्च (Q4 FY 2019-20) | ८.४ |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ (Q3 FY 2019-20) | ८.४ |
जुलै ते सप्टेंबर २०१९ (Q2 FY 2019-20) | ८.४ |
एप्रिल ते जून २०१९ (Q1 FY 2019-20) | ८.४ |
जानेवारी ते मार्च २०१९ (Q4 FY 2018-19) | ८.४ |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ (Q3 FY 2018-19) | ८.५ |
जुलै ते सप्टेंबर २०१८ (Q2 FY 2018-19) | ८.१ |
एप्रिल ते जून २०१८ (Q1 FY 2018-19) | ८.१ |
जानेवारी ते मार्च २०१८ (Q4 FY 2017-18) | ८.१ |
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ (Q3 FY 2017-18) | ८.३ |
जुलै ते सप्टेंबर २०१७ (Q2 FY 2017-18) | ८.३ |
एप्रिल ते जून २०१७ (Q1 FY 2017-18) | ८.४ |
आत्तापर्यंत प्रत्येक राज्यानुसार किती अकाउंट्स ओपन केले गेलेत आणि किती रक्कम पोस्ट ऑफिस आणि बँकेत जमा झाली त्यःची माहिती तुम्ही येथे क्लिक करून बघू शकता
SSY अकाउंट तुम्ही खालील बँकेत उघडू शकता
- HDFC Bank
- Axis Bank
- State Bank of India
- Bank of India
- Bank of Maharashtra
- Panjab National Bank
- Canara Bank
- IDBI Bank
- ICICI Bank
- UCO Bank
- Union Bank of India
- Bank of Baroda
- Panjab and Sindha Bank
- Indian bank
- Central Bank of India
हे कागदपत्रे गरजेचे आहेत:
१. आधार कार्ड
२. जन्म प्रमाणपत्र
३. पालकांचे KYC डोकमेंट्स
४. पासपोर्ट साईझ फोटो
सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कस उघडायचं ?
- खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे
- सुकन्या समृद्धी योजनेचं फॉर्म घ्यायचा आहे
- फॉर्म मध्ये विचारलेली सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे
- फॉर्म सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत
- यानंतर हा फॉर्म तुम्हाला संबंधित बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करायचा आहे
- अश्याप्रकारे तुम्ही तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता
तुम्हाला तुम्ही केलेल्या रकमेवर एका विशिष्ट काळानंतर खालीलप्रमाणे नफा मिळू शकतो
सुकन्या समृद्धी योजना २०२४ मध्ये जर तुम्ही १००० रुपये जमा केलेत तर तुम्हाला किती फायदा होईल ?
दरमहा १००० रुपये एका वर्ष्यासाठी जमा केलेत तर मिळणारी रक्कम १२०००/-
१५ वर्षात जमा झालेली एकूण रक्कम रु. १,८०,०००/-
२१ वर्षापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम रु. ३,२९,०००/-
माँटुरिटी पिरियड नंतर मिळणारी एकूण रक्कम रु. ५,०९,२१२/-
सुकन्या समृद्धी योजना २०२४ मध्ये जर तुम्ही २००० रुपये जमा केलेत तर तुम्हाला किती फायदा होईल ?
दरमहा २००० रुपये एका वर्ष्यासाठी जमा केलेत तर मिळणारी रक्कम २४०००/-
१५ वर्षात जमा झालेली एकूण रक्कम रु. ३,६०,०००/-
२१ वर्षापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम रु. ६,५८,४२५/-
माँटुरिटी पिरियड नंतर मिळणारी एकूण रक्कम रु. १०,१८,४२५/-
सुकन्या समृद्धी योजना २०२४ मध्ये जर तुम्ही ५००० रुपये जमा केलेत तर तुम्हाला किती फायदा होईल ?
दरमहा ५००० रुपये एका वर्ष्यासाठी जमा केलेत तर मिळणारी रक्कम ६०,०००/-
१५ वर्षात जमा झालेली एकूण रक्कम रु. ९,००,०००/-
२१ वर्षापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम रु. १६,४६,०६२/-
माँटुरिटी पिरियड नंतर मिळणारी एकूण रक्कम रु. २५,४६,०६२/-
सुकन्या समृद्धी योजना २०२४ मध्ये जर तुम्ही १०००० रुपये जमा केलेत तर तुम्हाला किती फायदा होईल ?
दरमहा १०००० रुपये एका वर्ष्यासाठी जमा केलेत तर मिळणारी रक्कम १,२०,०००/-
१५ वर्षात जमा झालेली एकूण रक्कम रु. १८,००,०००/-
२१ वर्षापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम रु. ३३,३०,३०७/-
माँटुरिटी पिरियड नंतर मिळणारी एकूण रक्कम रु. ५१,०३,७०७/-
सुकन्या समृद्धी योजने संबंधित नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्या वयात उघडता येते ?
खाते मुलीच्या जन्मानंतर लगेच किंवा मुलगी १० वर्ष्याची होण्याअगोदर उघडणे आवशक्यक आहे
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ऑनलाईन उघडता येते का ?
सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची प्रकिया offline जी तुम्ही कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत
सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पालकांचा रहिवासी दाखला आवश्यक आहे
सुकन्या समृद्धी योजनेतुन पैसे कसे काढायचे?
पैसे काढण्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखल, ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र आणि पैसे काढण्याचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातील शिल्लक रक्कम कशी तपासायची?
तुम्ही खाते उघडलेल्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जाऊन खात्यातील शिल्लक तपासू शकता