माझी लाडकी बहीण योजना २०२४: काय आहे हि माझी लाडकी बहीण योजना? महिलांना मिळणार महिन्याला १५०० रुपये, असा भरा अर्ज

महाराष्ट्र सरकार द्वारा सुरु केलेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हा आहे. 

माझी लाडकी बहीण हि योजना महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवून त्यांच्या विकासासाठी प्रेरणा देण्यासाठी उचललेले एक अभिनव पाऊल आहे. या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामुळे महिला आपल्या शिक्षणाकडे आणि सर्वांगीण विकासाकडे लक्ष्य देऊन आपले उद्दिष्ट साध्य करू शकतील. या योजने अंतर्गत महिलांना १५०० रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. 

खाली तुम्हाला माझी लाडकी बहीण योजेबद्दल सर्व माहिती दिली आहे आणि नारी शक्ती दूत या App द्वारे तुम्ही या योजनेचा अर्ज कसा भरू शकता याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे, कृपया ही माहिती शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या 

योजनेचे नावमुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना 
कुणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार 
पात्र लाभार्थी राज्यातील निराश्रित, विधवा किंवा आर्थिकदृष्टया दुर्बल महिला
राज्य महाराष्ट्र 
लाभ १५०० रुपये महिना  
उद्देश्यमहिलांना आर्थिकदृष्टया सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे 
वर्ष २०२४
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन किंवा ऑफलाईन 
अधिकृत सरकारी पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/

काय आहे मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना?

ही योजना सर्वप्रथम मध्यप्रदेश सरकारने राबवली होती आणि त्याचाच आधार घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्रात सुद्धा या योजनेचा शुभारंभ केला आहे. ही योजना नेहमीसाठी सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले आहे त्यामुळे या योजनेचा लाभ समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना मिळणार आहे. 

या योजनेमुळे महिला सशक्तीकरणाला गती मिळून महिलांना सर्वोतोपरी आत्मनिर्भर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.  

कधी सुरु झाली माझी लाडकी बहीण योजना ?

ही योजना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १७ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु झाली. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास एक करोड पेक्षा अधिक पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेन्द्रजी फडणवीस यांनी घोषणा केली आहे. 

आत्तापर्यंत किती महिलांना या योजनेचा लाभ मिळाला ?

माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काही महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी ३००० रुपये जमा झालेले आहेत. ही योजना मुखत्वे २१ ते ६५ वर्ष आयुर्मर्यादा असणाऱ्या वंचित घटकांतील महिलांसाठी राबवली जात आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख किंवा त्याच्या खाली आहे.  या योजनेचा माध्यमातूम सरकारचा मुख्य उद्देश हा समाजातील सर्व गरीब परिवारातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त बनविणे हा आहे 

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्यासंबंधी सूचना दिल्या आहेत ज्यामुळे महिलांनी दाखल केलेल्या अर्जाची योग्य पडताळणी होऊन पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. 

या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४६००० करोड इतका वार्षिक अतिरिक्त बोजा वाढणार आहे परंतु जर हि योजना यशस्वी झाली तर महिला सशक्तीकरनाला गती मिळून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचा दिशेनं टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊलच ठरणार आहे यात बिलकुल शंका नाही. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण २०२४ योजनेची ठळक उध्दिष्टये 

१. राज्यातील महिला व मुलींना पुरेश्या सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे 

२. महिला व मुलींचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे 

३. महाराष्ट्र राज्यातील मुलींना आणि महिलांना स्वावलंबी बनवून आत्मनिर्भर करणे 

४. राज्यातील महिला सशक्तीकरणाला चालना देणे 

५. लाभार्थी महिला व तिच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या आरोग्य, शिक्षण आणि पालन पोषण स्थितीत बदल घडवून आणणे 

६. या योजनेसाठी अर्ज करतांना कुठलाही शुल्क आकारल्या जाणार नाही 

७. योजनेसाठी पात्र महिलांना सदर रक्कम ही सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार 

८. महिलांना या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास त्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. महिला Naari Shakti Doot  App  द्वारे सुद्धा अर्ज करू शकतात 

९. या योजनेत मोफत ३ गॅस सिलेंडर दिल्या जातील आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्ष्याला ३ LPG गॅस सिलेंडर महिलांना दिले जातील 

१०. या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल 

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतात?

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी 

२. महिलांचं वय हे २१ ते ६५ वर्ष मध्ये असावं 

३. या योजनेसाठी सर्व विवाहित, अविवाहित, निराधार आणि विधवा, घटस्फोटीत महिला अर्ज करण्यास पात्र आहेत 

४. कुठल्याही बँकेत आधार लिंक असलेले खात असणे गरजेचे आहे 

५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखाच्या वरती नसावं 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण अपात्र आहेत 

१. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखाच्या वरती आहे 

२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहे 

३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही संस्थेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत 

४. लाभार्थी महिला जर शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या कुठल्याही आर्थिक योजनेतून दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल 

५. लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य जर  माजी किंवा विद्यमान आमदार किंवा खासदार असतील 

६. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा ते कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असेल 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र

१. आधार कार्ड 

२. ओळखपत्र 

३. बँक पासबुक 

४. जात प्रमाणपत्र 

५. अधिवास प्रमाणपत्र 

६. रेशन कार्ड 

७. जन्म प्रमाणपत्र 

८. मतदान ओळखपत्र 

९. पासपोर्ट साईझ फोटो 

१०. शाळा सोडल्याचा दाखला

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

१. ऑनलाईन  पद्धतीने 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिला राज्य सरकारने सुरु केलेल्या अँण्ड्रॉइड अँप्लिकेशन द्वारा किंवा या योजनेच्या वेबसाइट वर जाऊन आपला अर्ज भरू शकता.

ऑनलाईन अर्ज भरतांना विचारल्या गेलेली संपूर्ण माहित व्यवस्थित भरावी लागेल  आणि त्याच बरोबर लागणारी आवश्यक ती कागदपत्रे जसे कि आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला इत्यादी स्कॅन करून अपलोड करावी लागेल. 

माझी लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट 

राज्य सरकारने काही दिवसापूर्वीच या योजनेसाठी वेबसाइट सर्वांसाठी खुली करून दिली आहे. माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज भरण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईट ला visit करू शकता . 

माझी लाडकी बहीण योजना online Apply कस करायचं ?

या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी आधी तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावं लागेल. रेजिस्ट्रेशन नंतरच तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल ज्यातून तुम्ही स्वतःचा अर्ज भरू शकता 

माझी लाडकी बहीण योजना यासाठी रेजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील Steps Follow करा

१. राज्यसरकारच्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा 

२. तुम्हाला खालील होम पेज दिसेल

३. इथे तुम्हाला उजव्या हाताला वर अर्जदार लॉगिन चे option दिसेल, त्यावर क्लिक करा


४.जर या आधी तुम्ही रेजिस्ट्रेशन केले असेल तर सरळ तुमचा Username आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा

५. जर तुम्ही पहिल्यांदा या website ला भेट देत असाल तर Create Account या option वर  क्लिक करा

६. आता तुमच्या समोर नवीन Sign Up page येईल त्यावर विचारलेली माहिती जसे कि तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर , तुमचे गाव, तालुका, जिल्हा इत्यादी  न चुकता भरा

७. त्यानंतर नियम व शर्ती या checkbox वर क्लिक करा 

८. विचारलेला Captcha Code टाका 

९. शेवटी Sign Up बटण वर क्लिक करा

१०. आता तुम्ही तुमच्या Username आणि Password  वापरून लॉगिन करू शकता 

११. Login झाल्यानंतर तुम्हाला खालील Dashboard  दिसेल

१२. अर्ज करण्यासाठी Dashboard वर दिसणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर Click करायचं आहे 

१३. अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला तुमचा आधार नंबर तपासून किंवा Verify करून  घ्या  

१४. आधार नंबर Verify करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेला captcha कोड टाका

१५. यानंतर Send योतो  या बटण वर क्लिक करा

१६. आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाई वर तुम्हाला OTP येईल तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाका 

१७. त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म दिसेल 

१७. या फॉर्म मध्ये विचारल्या गेलेली संपूर्ण माहिती भरा 

१८. आवश्यक ती कागदपत्रे जोडा 

१९. शेवटी Submit बटण वर क्लिक करा 

अश्याप्रकारे सोप्प्या steps Follow करून तुम्ही स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकता 

Nari Shakti Doot App मधून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा 

१. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलच्या प्लायस्टोर मध्ये Nari Shakti Doot  अँप्लिकेशन शोधा आणि इन्स्टॉल करा 

२. त्यानंतर हे अँप्लिकेशन तुमच्या मोबाइलला स्क्रीन मध्ये Open होईल 

३. अँप्लिकेशन मध्ये तुमचा मोबाइल नंबर टाकून लॉगिन करा 

४. अँप्लिकेशन मध्ये माझी लाडकी बहीण योजना सिलेक्ट करा 

५. आता तुमच्या समोर तुम्हाला करावयाचा अर्ज दिसेल 

६. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती न चुकता भरा 

७. शेवटी Submit बटण वर क्लिक करा 

या पद्धतीने तुम्ही घरी बसून सुद्धा देखील अर्ज करू शकता

२. ऑफलाईन पद्धतीने 

प्रत्येक अंगणवाडी केंद्रात अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. महिला आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे सादर कर शकतात. या व्यतिरिक्त महिला आपल्या  जवळच्या ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये जाऊन सुद्धा ही प्रक्रिया पार पाडू शकतात.

अर्ज भरतांना अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता हि माहिती आधारकार्डाप्रमाणे अचूक भरावी त्याचसोबत बँकेचा तपशील आणि मोबाइल नंबर अचूक भरावा 

नेहमी विचारले जाणारं महत्वाचे प्रश्न  (FAQ )

१. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कसे भरावे 

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला किंवा लाडकी बहीण योजनेच्या विशिष्ट पोर्टल भेट द्या 

२. अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे काय ?

अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे अर्ज भरणाऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती ही बरोबर असल्याची खात्री अर्जदार स्वतः लेखी हमी देत आहे 

३. लाडकी बहीण योजनेसाठी कुठली कागदपत्रे लागतात 

लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात 

४.  माझी लाडकी बहीण योजनेतून मला किती पैसे मिळतील 

माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दर महिना १५०० रुपये मिळतील 

५. माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे 

माझी लाडकी बहीण ही योजना २१ ते ६५ वयोगटातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा, निराधार मुली आणि महिलांसाठी आहे.